मुंबई मधील भांडूप परिसरात असलेल्या ड्रीम्स मॉल मध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भांडुप मधील ड्रीम्स मॉल च्या बेसमेंटमध्ये असलेल्या पाण्यात एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळ्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भांडूप मधील ड्रीम्स मॉल हा बंद आहे. आगीच्या घटनेनंतर हा मॉल बंद अवस्थेत आहे. या मॉल मध्ये अनेक घटना घडल्या अशातच आता पुन्हा एकदा अनुचित प्रकार घडल्याचं समोर आला आहे.
Western Railway Mega block :मुंबईकरांनो सावधान! ‘या’ दिवशी होणार ‘जम्बो मेगाब्लॉक
ड्रीम्स मॉल मध्ये ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. त्या महिलेला तात्काळ मुलुंड मधील जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र त्या आधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सध्या महिलेच्या नातेवाईकांचा तपास सुरु आहे. या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली नसून भांडूप पोलिसांकडून तपास सुरु आहे. . तसंच या तरुणीची हत्या करण्यात आली की तिने आत्महत्या केली, याबाबतही अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.