-7.4 C
New York

Donald Trump : अमेरिकेत तृतीयपंथीयांना मान्यता नाही, ट्रम्पची मोठी घोषणा

Published:

तृतीयपंथीयांचा अधिकार हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत गाजत आहे. अशातच अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. शपथ घेताच त्यांनी अनेक निर्णय घेतले असून जो बायडेन यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय हे रद्द करुन टाकले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आपल्या कार्यकाळाची सुरुवात करतानाच काही महत्त्वाचे व जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होणारे निर्णय घेतले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताना, “आजपासून युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिकेत फक्त स्त्री व पुरुष या दोनच गटांना मान्यता असेल. अमेरिकन सरकारची ही अधिकृत भूमिका असेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. क्रीडा प्रकारांमध्ये तृतीयपंथींच्या समावेशाचा मुद्दा गेल्या काही काळात चर्चेत आला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्येदेखील काही महिला कुस्तीपटूंनी यासंदर्भात तक्रार केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्याआधी काढलेल्या रॅलीवेळी याबाबत भाष्य केलं होतं.

अमेरिकेत आता तृतीयपंथींना शासकीय मान्यता नसणार असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.तृतीयपंथींना शासकीय मान्यता असणार नाही. लवकरच ट्रम्प प्रशासनाकडून यासंदर्भातल्या शासकीय आदेशावर स्वाक्षरी केली जाईल. असा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. तर त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातदेखील अशाच प्रकारचे निर्णय घेतले होते. त्यानुसार, अमेरिकन लष्करात तृतीयपंथींना रुजू करून घेण्याची प्रक्रिया त्यांनी थांबवली होती. यावेळी या नव्या निर्णयाच्या अध्यादेशावर सही झाल्यानंतर सर्व प्रकारच्या शासकीय कागदपत्रांवर संबंधित व्यक्तीची ओळख म्हणून फक्त स्त्री व पुरुष हे दोनच रकाने असतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img