-7.6 C
New York

Donald Trump : तिसरं महायुद्ध होऊ देणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घोषणांचा पाऊस

Published:

डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज सोमवार (दि.20) रोजी शपथविधी सोहळा होत आहे. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. (Donald Trump) शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. अनेक परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, पदाची शपथ घेण्यापूर्वीच ट्रम्प यांनी मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा सत्तेत येण्यापूर्वी ‘तिसरे महायुद्ध’ थांबवण्याची प्रतिज्ञा केली आहे. ट्रम्प यांनी शपथविधीच्या एक दिवस आधी (दि.19) वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल वन अरेना येथे विजयी रॅलीला संबोधित केलं. ही रॅली मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA) या थीमवर आयोजित करण्यात आली होती. रॅलीमध्ये ट्रम्प यांनी काही तासांत बायडेनचे सर्व निर्णय मागं घेण्याचं आश्वासन दिले. स्थलांतराच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, सर्व बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत त्यांच्या घरी परत पाठवलं जाईल.

अमेरिकेत आज डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार

आम्ही आमची मालमत्ता परत मिळवणार आहोत. आमचे प्रशासन लवकरच देशाच्या सीमांवर पुन्हा नियंत्रण मिळवेल. यावेळी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी हद्दपार योजना राबणार आहोत. या मोहिमेद्वारे हजारो बेकायदेशीर निर्वासितांना देशातून बाहेर काढले जाईल. पण यासाठी बरीच वर्षे आणि खूप पैसा लागू शकतो. आम्ही अमेरिकेच्या भूमीवर कार्यरत असलेल्या प्रत्येक बेकायदेशीर परदेशी टोळी सदस्याला आणि स्थलांतरित गुन्हेगाराला हाकलून लावू असंही ते म्हणाले आहेत.

ट्रम्प पुढे म्हणाले, ‘मी युक्रेनमधील युद्ध संपवीन. मध्य पूर्वेतील अराजकता थांबवीन आणि तिसरे महायुद्ध होण्यापासूनही रोखेन. आपण याच्या किती जवळ आहोत याची तुम्हाला कल्पना नाही. गाझा युद्धबंदीचे श्रेय घेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर ते युद्धाच्या वेळी राष्ट्राध्यक्ष असते तर हे युद्ध झाले नसते असा दावाही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img