-7.6 C
New York

Maharashtra Politics : शिंदेंना संपवून राज्यात नवा ‘उदय’ होणार?; काँग्रेसच्या नेत्यांचे विधान म्हणजे भूकंपाची चाहूल

Published:

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Maharashtra Politics) नाराज असतानाच नवा उदय होणार होता असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भाजप एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकतो. चांगली ऑफर मिळत असेल तर, सावंत भाजपशी घरोबा करू शकतात असे अंधारेंनी म्हटले आहे. एवढेच काय तर, उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही डग्ग्यावर हात मारून आहेत, संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहेत असे म्हणत राऊतांसह अंधारे आणि वड्डेटीवारांनी राजकीय भूकंपाचे एकप्रकारे संकेतच दिले आहेत.

Maharashtra Politics काय म्हणाले राऊत?

काँग्रेसवाले उद्धव ठाकरे संपले आहेत अशी भाषा करतात तुम्ही कुठे आहात? शिवसेना संपली नाही आणि संपणार नाही. भाजपा-मोदी-शाह कोणालाही सोडत नाही, जे सख्खे आहेत त्यांनादेखील सोडत नाहीत, सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरु असते. उदय सामंत यांचे नाव घ्यावे ते त्यांना दावोसला घेऊन गेले आहेत. उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत अशी माझी माहिती आहेत, जेव्हा सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले. भाजपा सर्व गट फोडतील, फोडाफोडी हेच त्यांचे राजकारण असल्याचा हल्लाबोलही राऊतांनी केला आहे.

Maharashtra Politics शिंदेंची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो असे संकेत देणारे विधान केले आहे. ते म्हणाले की. नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न शिंदेंकडून सुरू आहे. पण शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट असल्याचे म्हणत शिंदे यांची गरज संपली का? असा प्रश्नदेखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंना संपून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल, तो उदय कुठला असेल, शिवसेनेच्या बाबतीत त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही डग्ग्यावर हात मारून आहेत, संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img