-7.6 C
New York

Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणारा शरीफुल कुस्तीच्या आखाड्यातील पैलवान…

Published:

सैफ अली खानवरील (Saif Ali Khan) हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा कुस्तीच्या आखाड्यातील पैलवान असल्याची माहिती समोर येत आहे. शरीफुल हा बांग्लादेशचा कुस्तीपटू असल्याचे सांगितले जात असून, सैफच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी त्याने शाहरुख आणि सलमान खानच्या घरांचीदेखील रेकीही केली होती. मात्र, इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत, सैफच्या घरात प्रवेश करणे सोपे असल्याने शरीफुलने सैफचे घर निवडल्याचे सांगितले जात आहे.

Saif Ali Khan शरीफुल बांग्लादेशच्या आखाड्यातील खेळाडू

सैफवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांग्लादेशचा रहिवासी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एवढेच काय तर, शरीफुल हा बांग्लादेशमधील कुस्तीच्या आखाड्यातील पैलवान असल्याचे सांगितले जात आहे. शरीफुल लहानपणापासून तो राहत असलेल्या वस्तीत कुस्ती खेळत असे. तसेच स्थानिक पातळीवरील काही कुस्ती स्पर्धांमध्येही तो सहभागी झाला होता.

Saif Ali Khan शाहरुख-सलमानच्या घराचीही रेकी

आरोपीने सैफवर हल्ला करण्यापूर्वी सैफच्या घरी काम करणाऱ्या लिमा यांनी आरोपीला पाहिले. त्यावेळी या दोघांमध्ये वादावादी झाली. हा आवाज ऐकून सैफ अली खानला जाग आली. त्यावेळी लिमा यांच्या बचावासाठी सैफने मध्यस्थी केली असता आरोपीने सैफच्या मानेवर आणि नंतर पाठीवर हातातील धारधार चाकूने वार करत घटनास्थळावरून पळ काढला. सूत्रांच्या माहितीनुसार सैफच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आरोपी मोहम्मद शहजादने अनेक सेलिब्रिटींच्या घरांचीदेखील रेकी केल्याचे सांगितले जात आहे. 14 जानेवारीचे एक सीसीटीव्ही समोर आले आहे, ज्यामध्ये आरोपी शाहरुख खानच्या घराची रेकी करताना दिसत आहे.

Saif Ali Khan शरीफुलचा अनेकवेळा गॅलेक्सीसमोर ठिय्या

मुंबईतील ब्रांद्रा परिसरात अनेक अभिनेत्यांचे वास्तव्य असून, शाहरुखच्या घरापासून काही अंतरावर सलमानचे घर आहे. आरोपींनी सलमान खानच्या घरासमोर बसून कशाप्रकारे घरात प्रवेश करता येईल याचा अभ्यास केला होता. पण सलमानच्या घरासमोर असलेला तगडा पोलीस बंदोबस्त आणि पकडले जाण्याची भीती यामुळे प्लॅन बदलला. ऑटोरिक्षातून प्रवास करताना आरोपींनी रिक्षाचालकाकडून या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती घेतली होती. पण इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत, सैफच्या घरात प्रवेश करणे सोपे असल्याने त्याच्या घराची निवड केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img