प्रतिनिधी : रमेश तांबे
पुणे : महाविद्यालयाच्या वतीने महिलांसाठी “महिला सबलीकरण” अंतर्गत एक दिवसीय ‘मोफत केक बनविण्याचे’ प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रा.डॉ.संजय देवकर यांनी दिली. हा उपक्रम डुंबरवाडी येथील महिलांच्या कौशल्यविकासासाठी महत्त्वाचा ठरला.
कार्यक्रमाला डुंबरवाडीच्या सरपंच शीतल गोरे, प्रा.सुवर्णा मटाले व प्रा.सरिता मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन प्रशिक्षक पल्लवी औटी यांनी केले. डुंबरवाडीतील महिलांसह महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रशिक्षण दरम्यान विविध प्रकारचे केक व ते बनविण्याच्या विविध पद्धती, साहित्याची निवड, तसेच डेकोरेशनच्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. मार्केटिंग बाबतही माहिती दिली गेली. महिलांनी हा उपक्रम अत्यंत आवडीने अनुभवला.
या उपक्रमातून डुंबरवाडीतील महिलांना गृह उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. सरपंच शितल गोरे यांनी महिलांच्या कौशल्यविकासासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे शितल गोरे यांनी यावेळी सांगितले.
उपस्थित महिलांनी अशा प्रकारच्या उपक्रमांचे कौतुक केले व भविष्यातही नेहमीप्रमाणे अशा प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी सहभागाची तयारी दर्शविली. नेहमीप्रमाणे महाविद्यालयांमध्ये महिला सबलीकरण अंतर्गत मोफत टेलरिंग कोर्स, ब्युटी पार्लर कोर्स राबविण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य देवकर यांनी सांगीतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रा.डॉ.संजय देवकर, प्रा.निलेश बटवाल, प्रा.नीलम शिवणे,प्रा.अस्मा इनामदार, प्रा.उमा काळे,प्रा. सारिका शेटे, प्रा.रामदास कदम ,प्रा.उल्हास पवार, तसेच ग्रंथपाल प्रा.ज्योती बेनके या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.