-7.6 C
New York

Sanjay Raut : एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा, संजय राऊत यांची खोचक टीका

Published:

राज्यातील आमदारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पालक मंत्री पदाचे वाटप नुकतेच पूर्ण झाले. मात्र पालकमंत्रीपदावरून पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस सुरू झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज झाल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. शनिवारी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली, मात्र या यादीमध्ये मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळू शकलेलं नाही.

दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती, मात्र गोगावले आणि भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे ते पुन्हा दरे गावी गेले आहेत, अशी चर्चाही आहे. आता याच मुद्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासादर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर टीका करत त्यांना टोला लगावला आहे. ” आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दुपारी जातात, दिवसा जातात. त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कुणी चालवायचं मग?” असा सवाल राऊतांनी (Sanjay Raut) विचारला.

बीडसाठी इतकी वर्षे काम केले, मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

” एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्याने खरं म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. नागा साधूही अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात आपल्या तंबूत बसतात. जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रात आहेत या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यराज जींनी प्रयागराजमध्ये काही तंबू आणि साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जायचं. अस्वस्थ आहात तर महाराष्ट्राला का त्रास देता. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या मुळावर , लोकांच्या मुळावर येतेय. जितके दिवस कुंभ आहे, तितके दिवस अस्वस्थ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी” असा खोचक सल्ला ही राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिला.

Sanjay Raut नाराजीचं कारण कळलं पाहिजे

नाराजीचं कारण राज्याला कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, तर नाराजीचं कारण नक्की काय आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी… नेमकं काय आहे ते कळलं पाहिजे आम्हाला, असं राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img