राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dhananjay Munde) यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणे आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराची जबाबदारी देण्यात आली आहे.
ल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र आता राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मनाला जातात आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांच्या टीकेला सामोरे जात असलेल्या सरकारने सावध भूमिका घेत धनंजय मुंडे यांचा पालकमंत्र्यांच्या यादीतून पत्ता कट केला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.