6.6 C
New York

Ladki Bahin Yojana : जेव्हा मतं घेतली तेव्हा त्रुटी माहित नव्हत्या का?, पटोलेंचा सरकारला संतप्त सवाल

Published:

‘लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम सरकार राबवणार आहे. मात्र, आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी (Ladki Bahin) ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) सरकारला चांगलंलं घेरलं. जेव्हा सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती, तेव्हा यात त्रुटी असतील हे सरकारला माहित नव्हतं का, असा सवाल पटोलेंनी केला. तसंच जेव्हा महिलांची मतं घेतली तेव्हा त्रुटी माहित नव्हत्या का? असंही पटोले म्हणाले.

ज्या महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिलांचे अर्ज बाद होणार असं सरकारनं म्हटलं आहे. यावर बोलतांना पटोले म्हणाले की, जेव्हा या महिलांची मते घेतली, तेव्हा पडताळणी केली होती का? सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा या योजनेत त्रुटी येतील, हे सरकारला माहित नव्हतं का?, असा सवाल पटोलेंनी केला. पुढं ते म्हणाले, आम्हाला लाडक्या बहिणींचा आशिर्वाद आहे, असं म्हणत हे सरकार सत्तेवर आलं आणि आता महिलांच्या नावांनी काही पुरुषांनीच पैसे घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. निवडून यायच्या आधी सरकारला या योजनेतील त्रुटी दिसल्या नाहीत आणि आता सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी सुरू केली. हा दुट्टपीपणा आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण, मुख्य आरोपी संजय रॉय दोषी

महिला बालविकास विभागाकडून लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने अनेक महिलांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.

Ladki Bahin Yojana अदिती तटकरे काय म्हणाल्या?

दरम्यान लाडक्या बहिण योजनेचे पैसे वसूल होण्याच्या या चर्चा खऱ्या आहेत का? असा सवाल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारला असता असं काहीच होणार नाही, अशी माहिती तटकरे यांनी दिली. त्या म्हणाल्या, लाडकी बहिण योजनेत दिलेले पैसे परत घेण्याचा कोणताही विचार नाही. परंतु, यापुढे निकषात बसणाऱ्या लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी विभागाकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत, असं त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img