1.6 C
New York

Pune : ओतूर येथे महिला प्रशिक्षणाचा समारोप संपन्न

Published:

[ आरी वर्क व ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण  ]

ओतूर,प्रतिनिधी:दि.१७ जानेवारी ( रमेश तांंबे )

गुरुवार दि. १६ रोजी ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगातून २०२४-२५ च्या माध्यमातुन पार्लर व आरी वर्कच्या  प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम ओतूर क्रीडा संकुल येथे पार पडला.१५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जवळपास १२५ महिलांना प्रशिक्षण दिले असल्याची माहिती ओतूरच्या सरपंच डॉ.छाया तांबे व उपसरपंच प्रशांत डुंबरे यांनी दिली.

या प्रशिक्षणा संदर्भात माहिती देताना सरपंच डॉ. छाया तांबे म्हणाल्या की, १५ व्या वित्त आयोगातून २०२४-२५ च्या माध्यमातुन महिलांसाठी आरी वर्क प्रशिक्षणासाठी १० दिवस व ब्युटी पार्लरसाठी ४५ दिवसांचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.तसेच ओतूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून २०२३-२४ मध्ये ही १५ व्या वित्त आयोगातुन केक प्रशिक्षण मसाले प्रशिक्षण,टेलरिंग प्रशिक्षण दिले होते.हे प्रशिक्षण पर्याय प्रतिष्ठाण च्या माध्यमातुन घेतले गेले.पर्याय प्रतिष्ठाणचे सर्वेसर्वा वामन बाजारे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.समारोप प्रसंगी ग्रामपंचायत ओतूर तसेच पर्याय प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी मनोरंजनासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या कार्यक्रम प्रसंगी माजी जि प सदस्य मोहित ढमाले, ओतूरच्या सरपंच डॉ. छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष फापाळे,दिलीप डुंबरे, रंजना डुंबरे,वनिता बटवाल,मनीषा वारे,प्रेमानंद आस्वार,शकुंतला डुंबरे, मयुरी खंडागळे,शोभा ढमाले यांच्यासह ओतूर गावच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img