1.6 C
New York

Chhagan Bhujbal : अजित पवारांबद्दल प्रश्न विचारताच छगन भुजबळ चिडले ?

Published:

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज झाले आहे. जहां नहीं चैना वहां नहीं रहना, असं म्हणत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला छगन भुजबळांनी हजेरी लावली. नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र छगन भुजबळ यांनी सर्व काही स्वच्छ झालं असं नाही, असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. “नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही व्यक्तीचं शिबीर नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal कोणाही एका व्यक्तीचं शिबीर नाही

“नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही. हे पक्षाचं शिबीर आहे. कोणाही एका व्यक्तीचं शिबीर नाही. काल प्रफुल्ल पटेल हे मला येऊन भेटले. त्यांनी दोन तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थोडावेळ यायला हवं. सुनील तटकरे यांनीही सांगितलं की तुम्ही थोडावेळ या. मला त्यांनी विनंती केली होती की थोडावेळ तरी या. म्हणून मी आलेलो आहे. याचा अर्थ सर्व काही स्वच्छ झालं असं होत नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडेंची दांडी; कारणही सांगितलं

Chhagan Bhujbal माझी तब्येत ठीक नाही

“राज्यसभेवर जायचं की नाही, असा प्रस्ताव नाही. येवला सोडून मी जाऊ शकत नाही. समता परिषदेचे काम चालू राहिल. माझी तब्येत ठीक नाही. त्यामुळे मी भाषण करणार नाही”, असे छगन भुजबळांनी म्हटले.

Chhagan Bhujbal अजित पवारांकडून संपर्क नाही

यावेळी छगन भुजबळ यांना अजित पवारांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी फोन केला होता का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सुरुवातीला नाही, असे म्हटले. यानंतर पुन्हा एकदा त्यांना तोच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ हे भडकले. “जाऊ द्या, एकदा नाही म्हणून सांगितलं ना”, असे छगन भुजबळ म्हणाले. यामुळे अजित पवारांनी छगन भुजबळ यांना कोणताही संपर्क केलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img