1.2 C
New York

Maharashtra Politics :  नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ-अजितदादा आमनेसामने? शिर्डीत शिबीर

Published:

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीकडून (Maharashtra Politics) जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर शिर्डीत आजपासून सुरू झाले आहे. नवसंकल्प शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी होणार आहे. या शिबिराला पक्षाचे प्रमुख नेते मंत्री कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, अजून तरी येथे त्यांचं आगमन झालेलं नाही.

मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट भुजबळांनी घेतली होती. त्यामुळे भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, यानंतर शिर्डीत राष्ट्रवादीचे शिबिर सुरू झाले आहे. या शिबिराला भुजबळ हजर राहतील अशी माहिती मिळाली आहे.

विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहे. यासाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजपने शिर्डीत महाअधिवेशन घेतले होते या अधिवेशनाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांबाबत लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते व पदधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

आता त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिबीर शिर्डी येथे पार पडत आहे. या शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितांशी संवाद साधणार आहे. या शिबिराला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी, सयाजी शिंदे, किरण लहामटे, काशिनाथ दाते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Politics भुजबळांची नाराजी…उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. त्यानंतर त्यांची जाहीर नाराजी त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली. भुजबळांच्या नाराजीनंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान आजपासून असलेल्या दोन दिवसीय शिबिराला छगन भुजबळ हे उपस्थित राहणार का हे पाहणे महत्वाचे आहे. प्रकृतीच्या कारणामुळे भुजबळ उपस्थित राहणार नाहीत असेही सांगितले जात आहे. काही जणांकडून मात्र भुजबळ येणार असल्याचे सांगितले जात आहे. या परस्पर विरोधी दाव्यांमुळे छगन भुजबळांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img