संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Election 2025 ) 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे. यावेळी सत्ताधारी आम आदमी पार्टी (AAP) , काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तर आज भाजपने देखील विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
आपल्या जाहीरनामाल्या भाजपने ‘संकल्प पत्र’ (BJP Sankalp Patra) असे नाव दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
यावेळी जेपी नड्डा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारताची राजकीय संस्कृती बदलली आहे. पूर्वी लोक आणि पक्ष जाहीरनामा विसरायचे. आता हा संकल्प आहे आणि तो जमिनीवर आणला जात आहे. भाजप जे बोलते ते करते. मोदींची हमी ही हमी पूर्ण होईल याची हमी आहे. 2014, 2019 च्या लोकसभेत दिलेल्या आश्वासनांपैकी 95 टक्के आश्वासने पूर्ण झाली आहेत आणि उर्वरित आश्वासने पूर्ण होणार आहेत. असं जेपी नड्डा म्हणाले.
भाजप महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा प्रमाणे, महिला समृद्धी योजनेअंतर्गत दरमहा 2500 रुपये देणार आहे. गरीब महिलांसाठी 500 रुपयांना गॅस सिलेंडर आणि होळी आणि दिवाळीला दोन मोफत सिलेंडर. गर्भवती महिलांना 21 हजार रुपये रोख आणि पोषण किट देण्याचे आश्वासन भाजपकडून जाहीरमान्यात देण्यात आले आहे.
तसेच आम आदमी पार्टीने दिल्लीतील 51 लाख लोकांना आयुष्मान भारत योजनेपासून वंचित ठेवले आहे पण भाजप सत्तेत येताचा या लोकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार असं देखील यावेळी जेपी नड्डा म्हणाले. तसेच दिल्ली सरकारकडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा आहे. अशा प्रकारे 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा, 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार असल्याचे आश्वासन भाजपकडून दिल्लीच्या नागरिकांना देण्यात आले आहे.