-2.7 C
New York

Sanjay Shirsat : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी

Published:

मंत्रीपदी असतानाही ‘सिडको’च्या अध्यक्षपदी ठाण मांडून बसलेले शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांची अखेर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. (Sanjay Shirsat) महायुती सरकारच्या काळात मंत्रीपदाने हुलकावणी दिलेल्या संजय शिरसाट यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लावली होती.

Sanjay Shirsat राजीनामा देणं अपेक्षित

महायुतीचं पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर आता महायुती सरकारमध्ये संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खातं सोपवलं आहे. नियम आणि संकेतानुसार मंत्रीपदी विराजमान झालेल्या व्यक्तीने मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं अपेक्षित असते. अशातच आता शिरसाट गेले महिनाभराहून अधिक काळापासून दोन्ही पदावर कार्यरत होते.

दरम्यान, नगरविकास विभागाने शिरसाट यांचा अध्यक्षपदाचा कार्य़भार संपुष्टात आणला आहे. शिरसाट यांची मंत्रीपदी निवड झाल्याने त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणण्यात आल्याचं नगरविकास विभागाने एका आदेशान्वये जाहीर केलं आहे.

Sanjay Shirsat संचालक मंडळाच्या बैठका

पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत एक व्यक्ती, एक पद हे सूत्र राबवले जाईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये जाहीर केलं असले तरी शिरसाट मात्र गेल्या महिनाभर अध्यक्षपदावर ठाण मांडून बसले होते. एवढेच नव्हे तर संचालक मंडळाच्या बैठका घेत निर्णयांचा धडाका लावला होता. एकच व्यक्ती दोन पदावर राहणं, लाभाचे पद उपभोगणे याबाबत पक्षातूनच उपमुख्यमंत्री शिंदे तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर शिरसाट यांना अध्यक्षपदावरून त्वरित दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागास दिले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img