हेन्ले ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची रँकिंग पाच अंकांनी (Henley Passport Index) घसरली आहे. तर सिंगापूरचा पासपोर्ट (Singapore) जगात सर्वाधिक मजबूत दाखवण्यात आला आहे. संस्थेने जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सिंगापूरचा पासपोर्ट पहिल्या तर जपानचा पासपोर्ट दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सिंगापूरचे पासपोर्टधारक जगातील 195 देशांत व्हिजा फ्री प्रवेश घेऊ शकतात.
अशातच आता प्रश्न विचारला जात आहे की एखाद्या देशाचा पासपोर्ट कमकुवत आहे की मजबूत आहे हे निश्चित करण्यासाठी कोणत्या निकषांचा आधार घेतला जातो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तरही जाणून घेऊ या..
जगातील सर्वाधिक प्रभावी पासपोर्टची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. 2025 च्या या रँकिंगनुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगात पहिल्या क्रमांकावर आहे. या देशातील नागरिक जगातील 195 देशांत व्हीजा फ्री यात्रा करू शकतात. या रँकिंगमध्ये भारतीय पासपोर्ट 85 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी हाच पासपोर्ट 80 व्या क्रमांकावर होता. म्हणजेच पासपोर्टच्या रँकिंग मध्ये पाच अंकांची घसरण झाली आहे. शक्तिशाली पासपोर्टचा अर्थ म्हणजे पासपोर्टधारक किती देशांत व्हीजा फ्री एन्ट्री करू शकतात. आता एखाद्या देशाचा पासपोर्ट किती मजबूत किंवा किती कमकुवत आहे हे कशावरून ठरवण्यात येते याची माहिती घेऊ..
पासपोर्टची रँकिंग तयार करण्याचं काम हेन्ले ग्लोबल कंपनी करते. यासाठी कंपनीकडून इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या विशेष डेटाचा वापर केला जातो. या माध्यमातून तयार होणाऱ्या हेन्ले ग्लोबल पासपोर्ट डेटाबेसमध्ये सर्व 199 देशांना सहभागी केले जाते.
एखाद्या देशाचा पासपोर्ट मजबूत असेल किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेचीही मोठी भूमिका असते. ज्या देशांचा जीडीपी चांगला असतो त्या देशांतील पासपोर्टधारक लोकांना जास्त देशांत व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. देशातील राजकीय यंत्रणा किती मजबूत आणि स्थिर आहे यावरून त्या देशात किती शांतता आहे याचा अंदाज येतो. जर पॉलिटिकल सिस्टीममध्ये स्थिरता आहे तर त्या देशाच्या पासपोर्टची रँकिंग चांगली असते.
एखाद्या देशाचे दुसऱ्या देशाशी संबंध कसे आहेत हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. पासपोर्ट मजबूत असणाऱ्या देशांशी डिप्लोमॅटीक संबंध चांगले राखणाऱ्या देशाचा पासपोर्ट मजबूत होण्याची शक्यता जास्त असते.
Henley Passport Index दहशतवाद, हिंसाचाराचा बसतो फटका
एखाद्या देशातील दहशतवादाच्या घटना, हिंसाचार, अशांतता त्या देशाची जगातील प्रतिमा मलिन करतात. त्या देशातील वातावरण पर्यटकांसाठी योग्य नाही असा अर्थ यातून निघतो. पासपोर्ट इंडेक्स तयार करताना या गोष्टीचा प्राधान्याने विचार केला जातो.
Henley Passport Index पासपोर्ट स्ट्राँग असण्याचा फायदा कोणाला
पासपोर्ट स्ट्राँग असला तर त्याचा अनेक प्रकारे फायदा त्या देशाला मिळतो. पहिला फायदा त्या देशातील लोकांना मिळतो. या देशातील लोक जगातील जास्तीत जास्त देशांत व्हिसा फ्री प्रवास करू शकतात. मजबूत पासपोर्ट असणारे देश पर्यटकांना आकर्षित करून अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करू शकता. असे देश गुंतवणूकदारांचे ध्यान आकर्षित करतात. जास्त गुंतवणूकदार आले की अर्थव्यवस्थेला सुद्धा बूस्ट मिळतो. देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.