भारतीय क्रिकेट (Indian Team) नियामक मंडळाने (BCCI) 10 नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम सर्व भारतीय खेळाडूंना पाळणे अनिवार्य (Cricket News) आहे. याचे उल्लंघन केल्यास खेळाडूंना कठोर शिक्षाही होऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास पगार कपात ते आयपीएल बंदी यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. बीसीसीआयने जारी केलेले 10 नियम (BCCI 10 Points Policy) काय आहेत? ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.
- देशांतर्गत सामने खेळणे अनिवार्य
भारतीय राष्ट्रीय संघाकडून खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत समावेश आहे. सर्व खेळाडूंना बोर्डाने आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धेत खेळणे बंधनकारक आहे. यामध्ये आयपीएलचाही समावेश आहे. जर एखादा खेळाडू या नियमाचे उल्लंघन करताना आढळला, तर त्याला बोर्डाकडून त्याच्या पगारात कपात, त्याच्या सामन्याच्या मानधनात कपात किंवा आयपीएल बंदी देखील लागू शकते.
- सर्व खेळाडूंना एकत्रित प्रवास
सर्व खेळाडूंनी एकत्र प्रवास करणे बंधनकारक आहे. मग, ते एखाद्या सामन्यासाठी किंवा सराव सत्रासाठी प्रवास करत असतील. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसह प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं देखील बोर्डाने स्पष्ट केलंय.
- प्रवासादरम्यान जास्त सामान नेण्यास मनाई
नवीन नियमानुसार खेळाडूंना प्रवासादरम्यान जास्त सामान नेण्यास मनाई आहे. खेळाडू आता एका प्रवासात 150 किलोपर्यंतचे सामान आणि सपोर्ट स्टाफला 80 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतात. जर कोणत्याही खेळाडूने या नियमाचे उल्लंघन केले, तर त्याला स्वतः पैसे भरावे लागतील.
- वैयक्तिक कर्मचाऱ्यांना परवानगी नाही
बीसीसीआयच्या परवानगीशिवाय खेळाडू कोणत्याही दौऱ्यासाठी किंवा मालिकेसाठी वैयक्तिक कर्मचारी (व्यवस्थापक, कुक इ.) सोबत घेऊ शकत नाहीत.
- सेंटर ऑफ एक्सलन्सला बॅग पाठवल्या जातील
संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाशी समन्वय साधावा लागेल. की प्रत्येकाच्या वस्तू आणि वैयक्तिक वस्तू बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जातील. यापेक्षा जास्त काही खर्च झाल्यास, खेळाडूला स्वतः पैसे द्यावे लागतील.
- सराव सत्रांना एकत्र जावं लागणार
सर्व खेळाडूंना सराव सत्रात सहभागी व्हावे लागेल. मुक्कामाच्या ठिकाणापासून ते मैदानापर्यंत एकत्र प्रवास करावा लागेल. संघात एकता आणण्यासाठी हा नियम बनवला गेला आहे.
- जाहिराती शूट करण्याचं स्वातंत्र्य नाही
कोणतीही मालिका सुरू असेल किंवा संघ परदेश दौऱ्यावर असेल. तर खेळाडूंना वैयक्तिक जाहिरात शूट करण्याचे किंवा प्रायोजकांसोबत काम करण्याचे स्वातंत्र्य नसेल.
- पत्नी/कुटुंबासाठी आता फक्त दोन आठवडे
जर भारतीय संघ 45 किंवा त्याहून अधिक दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असेल. अशा परिस्थितीत खेळाडूचे कुटुंब केवळ 2 आठवडेच त्याच्यासोबत राहू शकते. भेटीच्या कालावधीचा खर्च बीसीसीआय उचलणार आहे. तर उर्वरित खर्च खेळाडूंना स्वत:ला करावा लागणार आहे.
- बीसीसीआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती
BCCI द्वारे आयोजित केलेल्या शूट आणि इतर सर्व कार्यक्रमांसाठी खेळाडूंनी उपस्थित असणे आवश्यक आहे. यामुळे संघाप्रती खेळाडूंची एकजूट वाढण्यास तसेच क्रिकेट खेळाला चालना मिळण्यास मदत होईल.
- खेळाडूंना एकत्र राहावे लागणार
नियोजित वेळेपूर्वी सामना संपला तरीही, सामना किंवा मालिका संपेपर्यंत सर्व खेळाडूंना एकत्र राहावे लागणार आहे.