-3 C
New York

Gautam Adani : अदानींना धक्का देणाऱ्या हिंडेनबर्गला टाळं; कंपनीच्या संस्थापकानेच केली घोषणा

Published:

अदानी ग्रुपला (Gautam Adani) हादरवून सोडणाऱ्या अमेरिकीची शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गचे ग्रह फिरले आहेत. या संस्थेचं दुकान लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसनने बुधवारी कंपनी बंद करत असल्याची घोषणा केली. अँडरसन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट लिहीत या निर्णयाची माहिती दिली. योजना अशी होती की आम्ही ज्या विचारांव काम करत होतो ते पूर्ण झाल्यानंतर कंपनी बंद करावी. आज तो दिवस आहे, असे अँडरसन यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिंडनबर्ग संस्थेची स्थापना सन 2017 मध्ये झाली होती. संस्थेने इंडस्ट्रीतील भ्रष्टाचार, फसवणूक आणि अयोग्य व्यवस्थापन उजेडात आणण्यासाठी काम केलं. यामुळे संस्थेला जगभरात ओळख मिळाली. आम्ही काही साम्राज्यांना हादरवून सोडलं. या साम्राज्यांना धक्का दिला पाहिजे असं आम्हालाही वाटत होतं असे अँडरसन यांनी सांगितले. यामध्ये भारतातील अदानी ग्रुपचाही समावेश होता.

अँडरसन यांनी जानेवारी 2023 मध्ये गौतम अदानी ग्रुपवर अफरातफरी, फसवणूक यांसारखे आरोप लावत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाने जगभरात खळबळ उडाली. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी (Gautam Adani) त्यावेळी जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. अँडरसनने डोरसीच्या ब्लॉक इंक आणि इकान एंटरप्रायजेस संबंधित एक अहवाल समोर आणला होता. अदानी ग्रुपने हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. समूहाला अस्थिर करण्याच्या उद्देशाने आणि राजकीयदृष्ट्या भारताची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने असे प्रकार केले जात असल्याचे अदानी ग्रुपने त्यावेळी स्पष्ट केले होते.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सुरुवातीला फर्मला तीन खटले आण आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यामुळे अँडरसनच्या अडचणी वाढल्या. यानंतर अँडरसनने कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयाची माहिती देताना अँडरसनने सांगितलं की संस्था बंद करण्याचा निर्णय अतिशय व्यक्तिगत होता. फार काही अडचणी नसताना हा निर्णय घेतला.

Gautam Adani आता अँडरसन काय करणार

कंपनी बंद केल्यानंतर आता अँडरसन काय करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पुढील सहा महिन्यांत मी माझ्या आगामी मॉडेलवर नियोजन करणार आहे. या संबंधित माहिती आणि व्हिडिओच्या एका मालिकेवर काम करण्याची योजना तयार करत आहोत असे अँडरसन म्हणाला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img