-3.8 C
New York

Sanjay Raut : सैफवर हल्ला अन् राऊतांचा गृहमंत्रालयावर निशाणा; म्हणाले

Published:

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे. सरकार निवडणुका, सभा, संमेलन, उत्सव, शिबिरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगत स्वागतामध्ये गुंतून पडलं आहे. बीडपासून मुंबईपर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याचे वाभाडे काढले आहेत. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत होते. सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार… पंतप्रधान मोदी मुंबईत असले तरी राज्यात काय चालले आहे, हा प्रश्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावा. आम्ही त्यांच्यावर काय भाष्य केले, तर त्यांना वेदना होतात. मात्र, राज्यात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर, घरात, चाळीत चोर, दरोडेखोर घुसतात.”

“कलाकारांच्या घरांना सुरक्षा व्यवस्था आहे. हा नरेंद्र मोदींसाठी धक्का आहे. 15 दिवसांपूर्वी सैफ अली खान कुटुंबासोबत पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी गेला होता. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कुटुंबासोबत एक तास व्यतित केला. त्यानंतर आता चोरींनी सैफ अली खानवर हल्ला झाला. राज्यात कुणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणे मुश्किल झालं आहे,” असं राऊतांनी म्हटलं.

अदानींना धक्का देणाऱ्या हिंडेनबर्गला टाळं; कंपनीच्या संस्थापकानेच केली घोषणा

“राज्यातील 90 टक्के पोलीस हे फुटलेल्या लोकांच्या संरक्षणासाठी आहेत. कुणी साधा आमचा उपशाखाप्रमुख फुटला तर दोन गनचे आणि तालुकाप्रमुख फुटला तर एक गन आणि जिल्हाप्रमुख फुटला तर पाच गनचा पोलीस दिला जातो. मात्र, सामान्य माणसाला कुठलीही सुरक्षा नाही. गद्दार, बेईमान, भ्रष्टाचारी आणि बिल्डर लोकांना सुरक्षा आहे,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.

“सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार या सरकारनं दिला आहे. पद्मश्री पुरस्कार असलेल्या व्यक्तीला सुरक्षित राहता येत नाही. पोलीस चोराला पकडतील. पण, तुम्ही किती चोरांना पकडणार आहात? कायद्याच्या संदर्भात भीती राहिली नाही. सैफ अली खानवरील हल्ला हा गंभीर आहे. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा उघडे पडले आहे,” अशी टीका राऊतांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img