-3.8 C
New York

Saif Ali Khan : सैफच्या थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टरांनी सर्जरीनंतर नेमकं काय सांगितलं?

Published:

अभिनेता सैल अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर त्याच्याव मुंबईतील लिलावती रूग्णालयात तातडीचे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सैळ अली खानच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती देत सैफच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील दुखापत झाली असून, सध्या त्याला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यासंदर्भत लिलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

Saif Ali Khan सैफच्या थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत

मध्यरात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टारांकडून सर्जरी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले की, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आलं आहे. सैफच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील मोठी दुखापत झाली असून, स्पायनल फ्लुईडचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. याशिवाय हातावर, मानेवरही घाव होते त्याची प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली आहे.

Saif Ali Khan डिस्जार्ज कधी?

सैफ अली वर उपचा करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, सर्जरीनंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून, त्याला एक दिवसासाठी अतिदक्षता विभागात निगराणीसाठी ठेवण्यात आले असून, त्याची तब्येतीची 100 टक्के रिकव्हरी होईल असा विश्वासह डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. साधारण एक ते दोन दिवसात रूग्णालयातून डिस्जार्ज देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले होते, त्यापैकी दोन जखमा गंभीर, तर दोन मध्यम स्वरुपाच्या जखमा होत्या असेही डॉक्टरांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img