-3 C
New York

Jitendra Awhad : ‘हा हल्ला पुर्वनियोजित कटाचा भाग….’सैफ वर झालेल्या हल्ल्यावर आव्हाडांचा संशंय

Published:

बॉलीवूड मधील आघाडीचा आणि चर्चेत असलेला अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan ) याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. काल (१५ जानेवारी) च्या मध्यरात्री काही अज्ञातांनी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी ‘सद्गुरू शरण’ या राहत्या घरी घुसत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तर क्राइम ब्रँचची टीम दाखल झाली आहे. घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत.या घटनेवर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या एक्स (X) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ‘सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.’ अशी शक्यता वर्तवली आहे.

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan ) याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणाले, ‘सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव #तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते.ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे.

‘कारण,सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे.त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते.एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे.त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे.हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता,वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्‍या #पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे.हे विशेष !’ असं म्हणत #विषरंगदाखवतयं_का असा हॅशटॅग देखील दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img