-3 C
New York

Israel Hamas War : अखेर गाझा युद्ध संपलं! लवकरच होणार युद्धविराम

Published:

इस्त्रायल आणि हमास यांच्यात मागील पंधरा (Israel Hamas War) महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे. युद्धविराम आणि बंधकांच्या बाबतीत झालेल्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांनीही याला दुजोरा दिला. या युद्धात आतापर्यंत 46 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध 7 ऑक्टोबर 2023 ला सुरू झालं होतं. या दिवशी हमासच्या अतिरेक्यांनी दक्षिण इस्त्रायलवर हल्ला करत तब्बल 1200 लोकांची हत्या केली होती. तसेच 250 पेक्षा जास्त लोकांना कैद केले होते. यानंतर इस्त्रायलनेही अभियान सुरू केले होते. यामध्ये गाझातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनुसार 46 हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला.

व्हाइटहाऊसने बायडन यांच्या हवाल्याने सांगितले की इजिप्त आणि कतर यांच्याबरोबर अमेरिकने अनेक महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे. इस्त्रायल आणि हमास युद्धविरामासाठी तयार झाले आहेत. हा करार युद्ध संपवण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. पंधरा महिन्यांपासून कैदेत असणाऱ्या नागरिकांची सुटका होणार आहे. या करारानंतर पंधरा महिन्यांपासून सुरू असलेला हा संघर्ष थांबणार आहे.

वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय

या पंधरा महिन्यांच्या काळात नेमकं काय घडलं याचा थोडक्यात आढावा घेऊ या..

7 ऑक्टोबर 2023 : हमासच्या अतिरेक्यांन दक्षिण इस्त्रायलमध्ये घुसखोरी करत हिंसाचार घडवला. हमासच्या या हवाई हल्ल्यात या परिसराची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली होती.
8 ऑक्टोबर : लेबनॉनच्या हिजबुल्ला संघटनेने इस्त्रायलवर हल्ल्याचा दावा करत पॅलेस्टाइनला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
13 ऑक्टोबर : इस्त्रायलने गाझा शहरातील नागरिकांना दक्षिणेकडे जाण्याचा सल्ला दिला. यामुळे गाझातील जवळपास सर्व लोकसंख्या विस्थापित झाली.
19 ऑक्टोबर : एका अमेरिकन जहाजाने यमन येथून इस्त्रायलवर डागण्यात आलेल्या मिसाइल आणि ड्रोनला रोखले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
21 ऑक्टोबर : इजिप्त येथून गाझा पट्टीत राफा हद्दीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, तरीही हे मानवनिर्मित संकट अधिक गडद होत गेले.
27 ऑक्टोबर : इस्त्रायलने प्रत्युत्तर देत गाझात पहिला जमिनी हल्ला केला.
15 नोव्हेंबर : इस्त्रायलच्या सैन्याने गाझातील सर्वात मोठे रुग्णालय अल शिफा ताब्यात घेतले. यानंतर पुढील काही आठवड्यांत उत्तर गाझातील सर्व रुग्णालये बंद झाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img