बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झाल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. विरोधकांनी गृहविभागावर प्रश्नचिन्ह उभं केलं. तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी या हल्ला प्रकरणावर भाष्य करतांना मुंबईतील (Mumbai) कायदा आणि सुव्यवस्था ढासाळेतय, असं म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) बोट दाखवलं होतं. त्यावर आता फडणवीस यांनी भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शरद पवारांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, मला असं वाटतं की, देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मंबई आहे. कधी कधी अशा घटना घडतात. त्या घटनांना गांभीर्यान घेतलं पाहिजे. पण, केवळ काही घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणे चुकीचे आहे. विरोधकांचे हे आरोप बिनबुडाचे आहेत.
मुंबई सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करेल, असं ते म्हणाले. सैफ अली खानवरील सैफ अली खानवरील हल्ल्याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी बोलतांना फडणीसांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. कॉंग्रेस संविधान-संविधान घेऊन नाचतंय, पण त्याच कॉंग्रेसने संविधानची हत्या करून देशाला बंदीवान केलं होतं, अशी टीका फडणवीसांना केली होती.
Devendra Fadnavis शरद पवार काय म्हणाले?
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरही भाष्य करतांना शरद पवार म्हणाले होते की, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासाळण्याचे हे लक्षण आहे. याच भागात मध्यंतरी एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. या सर्व गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहावं, असं पवार म्हणाले होते.