-4.5 C
New York

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? CM फडणवीसांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर!

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) आणि भाजपात पुन्हा समेट होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु, महायुतीच्या नेत्यांकडून अशा शक्यता फेटाळून लावल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच या मुद्द्यावर यानंतर आता भाष्य केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंना भविष्यात सोबत घेणार का या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आता चौथ्या सहकाऱ्याची आमच्या तिघांच्या महायुतीत गरज नाही असे उत्तर फडणवीस यांनी दिले.

सध्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत तुमचं कौतुक करत आहेत असे विचारलं असता फडणवीस म्हणाले, कौतुकाकडे दुर्लक्ष करायचं असतं. अनेकदा फूट पाडण्यासाठी राजकारणात असं कौतुक केलं जातं. त्यापासून सावध राहण्याची गरज असते. कुणी कितीही कौतुक केलं तरी आपले पाय मात्र जमिनीवरच राहिले पाहिजेत राजकारणात ही गोष्ट पाळली पाहिजे.

उद्धव ठाकरेंना भविष्यात सोबत घेणार का या प्रश्नावर मात्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. आमच्या तीन खुर्च्यांचे स्थान आता मजबूत आहे. चौथ्या सहकाऱ्याची आम्हाला गरज नाही. आमची महायुती मजबूत असून शेवटपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचे राहिल. उद्धव ठाकरेंसाठी आता भाजप आणि महायुतीचे दरवाजे बंद असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis पीएम मोदींच्या विचारांचा मी वारसदार

देशाची सेवा आणि समाजसेवेचा मंत्र मला संघाकडून लहापणीच मिळाला आहे. त्यामुळे आम्हाला मिळालेलं पद हे पद नाही तर ती एक जबाबदारी आहे. मी उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचारांचे आहेत त्याच विचारांचा मी वारसदार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img