-5.2 C
New York

Accident : मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू

Published:

मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा अत्यंत भीषण अपघात झाला. (Accident) कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Accident नेमकं काय घडलं?

पहाटे तीनच्या सुमारास नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळअपघात झाला. माल वाहतूक ट्रकला, बस व मागील एकूण चार गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १४ जण अपघातात जखमी झाले आहेत. या जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल‌ झालेत.

Accident तातडीचं बचावकार्य

समोर आलेल्या माहितीनुसार गोठेघर या ठिकाणी हा अपघात झाला. या अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मालवाहतूक ट्रकलाच पाठीमागून येणाऱ्या वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला. या ठिकाणी बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आलं. अपघातात पाचही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img