यूपीएससी नागरी सेवा परिक्षेत फसवणूक करणााऱ्या वादग्रस्त माजी आयएएस प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकरला (Pooja Khedkar) मोठा दिलासा देत सुप्रीम कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत तिच्या अटकेला स्थगिती देण्याचे आदेश बुधवारी (दि.15) दिले आहेत.
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर दिल्ली पोलीस आणि यूपीएससीला नोटीस बजावत पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत अंतरिम संरक्षण देण्याचे निर्देश देत न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने तिच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
वाजपेयी-अडवाणींनाही तुम्ही हेच म्हणाला असता का?’भाजप नेत्याचा पवारांना सवाल
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजु झालेल्या पूजा खेडकर यांना युपीएससी परिक्षेत 821 वी रँक मिळाली होती. त्यानंतरही त्यांना आयएएस केडर मिळाले. यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांनी दृष्टीहीन असून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. यासोबतच त्यांची निवड ओबीसी प्रवर्गातून झाली होती. यासाठी वडिलांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा अधिक असूनही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.