-4.5 C
New York

Vinod Tawde : ‘दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून…’, विनोद तावडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

Published:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिर्डी (Shirdi) येथे आयोजित भाजपच्या (BJP) अधिवेशनात बोलताना शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत विधानसभा निवडणुकीत जनतेने शरद पवार यांनी बंडखोरी करुन विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं, त्याला आता तुम्ही धडा शिकवण्याचं काम केलं अशी टीका अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केली होती.

तर या टीकेला पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील असं शरद पवार म्हणाले होते.

बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणीच बरखास्त; निर्णयामागचं कारण काय?

तर आता या टीकेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी प्रत्युत्तर दिले. विनोद तावडे यांनी ट्विट करत दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत. असं विनोद तावडे म्हणाले.

दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटल जी, अडवाणी जी आणि 17 महिने अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते, मंत्री व पंतप्रधान ते नंतरच्या काळात झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? महाराष्ट्राच्या जनतेला हे पवार साहेबांनी नक्की सांगितले पाहिजे. असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विनोद तावडे यांच्या या टीकेला शरदचंद्र पवार पक्षाकडून काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img