मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (Devendra Fadnavis) सरकारच्या विविध विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये शिक्षण विभागाचाही समावेश होता. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शंभर दिवसांच्या आराखड्याचं सादरीकरण केलं. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यानुसार आवश्यक बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
भुसे म्हणाले, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपल्या राज्याचे राज्यगीत शाळांत गायले जात आहे. राष्ट्रगीताच्या नंतर राज्य गीत गाणं हे बंधनकारक आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी ते गायले जात नाही. सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं हे बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. मराठी भाषा प्रत्येक शाळेमध्ये शिकवण हे बंधनकारक आहे त्याची पण प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री भुसे म्हणाले.
प्रत्येक शाळेचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे त्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यात होणार आहे. ज्या शाळांत या सुविधा आधीपासूनच आहेत तिथे परत एकदा ते व्यवस्थित करण्यासाठी एक ड्राइव्ह केला जाईल. शालेय शिक्षण मंत्र्यांपासून केंद्रप्रमुखापर्यंत प्रत्येक जण जास्तीत जास्त शाळेला भेट देतील. तेथील पाहणी करतील आणि आपल्याला जे काही अपेक्षित आहे त्याबाबत सूचना देतील.
संजय राऊतांचं डोकं फिरल्यासारखं असं वाटतंय; अजित पवारांचं नाव घेताच तटकरे का भडकले?
पहिलीच्या विद्यार्थ्यांना साधारणपणे अंकांचा माहिती प्राथमिक पातळीवरचे ज्ञान मिळायला पाहिजे. दुसरी आणि तिसरीमध्ये वाचन करता आलं पाहिजे लिखाण करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आढावा घेतला जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी तर अतिशय उत्स्फूर्तपणे सांगिलं की येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचं स्वागत म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधी केले पाहिजे. आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये विभाग जरी वेगवेगळ्या असले तरी प्रत्येक अधिकारी, प्रत्येक लोकप्रतिनिधी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायला तिथे उपस्थित राहतील.
Dada Bhuse राज्यातील शाळांत सीबीएसई पॅटर्न
पुढच्या वर्षापासून चांगल्या गोष्टी आपल्या मराठी पॅटर्नमध्ये पण आपण सहभागी करण्यासाठी नियोजन झालेलं आहे. अंमलबजावणी पुढच्या वर्षाच्या म्हणजे 26-27 पासून होईल. 25-26 या वर्षात शिक्षकांना आधी प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. अभ्यासक्रम बदलणार आहे तर एकदम सर्व बदल होऊ शकणार नाही. म्हणून त्याची या वर्षभरात आम्ही पूर्वतयारी करणार आहोत. कदाचित चालू वर्षाला आपण जाण्याचा विभाग विचार करतो आहे. पुढील टप्प्यामध्ये एक किंवा दोन टप्प्यामध्ये सीबीएससी पॅटर्न ज्यात चांगल्या बाबी आहेत त्याचा समावेश आपल्या शिक्षणामध्ये केला जाईल.