काही दिवसांपुर्वी शिर्डीमध्ये भाजपचं महाविअधिवेशन पार पडलं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर घणाघाती टीका केली.ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर आज शरद पवारांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज पत्रकार परिषद पार पडली. त्यात त्यांनी अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत,’ गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे. देशात अनेक उत्तम, प्रशासक गृहमंत्री पाहिले, पण कोणाला त्यांच्या राज्याने तडीपार केलं नव्हतं. यशवंतराव चव्हाणांनी राज्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. जनसंघाच्या नेत्यांनीही आमच्यासह काम केलं.असं म्हणत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील कार्यक्रमात ‘महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं.’ अशी टीका केली होती.