मोदी सरकारने (Modi Govt) इतिहास शिकवणारे शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी (RBI Governor) नियुक्ती केली. याचा परिणाम असा झाला कि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असून या आठवड्यात रुपया इतिहासातील नीचांकी पातळीवर आपटला. दुसरीबाब अशी कि माजी गव्हर्नर दास हे महागाई 4 टक्क्यांपर्यंत आणण्यात अपयशी ठरले. तिसरी बाब अशी की भारताचा परकीय चलनसाठा (Forex Reserve) 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे 634 अब्ज डॉलर्सवर आला आहे. या सर्व प्रकाराला विश्लेषक आता माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना दोषी ठरवत आहेत.
Walmik Karad : वाल्मिक कराडला मोक्का! १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
प्रसिद्ध बाजार विश्लेषक आणि SBI म्युच्युअल फंडाचे माजी इक्विटी प्रमुख संदीप सभरवाल (Sandip Sabharwal) यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची धोरणं परकीय चलन साठा कमी होण्यास आणि अर्थव्यवस्थेच्या मंदीला जबाबदार असल्याचं म्हटलंय. सभरवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपलं मत व्यक्त केलंय. भारताचा परकीय चलनसाठा 10 महिन्याच्या नीचांकी पातळीवर 634 अब्ज डॉलर्सवर आला आहे. हा आकडा आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 70 अब्ज डॉलर्सने कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या आधीच्या गव्हर्नरांनी सर्व चलनांच्या तुलनेत डॉलर झपाट्यानं वाढत असताना स्पॉट आणि फॉरवर्ड अमेरिकन डॉलर विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा साठा वाया घालवणाऱ्या धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच दास यांनी विकासदर वाढवून सांगितला आणि कॅशला मर्यादित ठेवले. त्यांची धोरणे योग्य नव्हती. त्याचेच परिणाम आता देशाला भोगावे लागत असल्याचेही त्यांनी म्हंटले.
RBI च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा सलग पाचव्या आठवड्यात घसरून 3 जानेवारीपर्यंत 634.59 अब्ज डॉलर्सवर आला आहे. सप्टेंबर अखेरच्या 704.89 अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवरून हा साठा सुमारे 70 अब्ज डॉलर्सनं घसरलाय. डॉलरच्या तुलनेत सातत्याने रूपयाचे मूल्य घसरत असल्याने देशात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतरही RBI महागाई 4 टक्क्यांपर्यंत आणू शकली नाही. आता परत एकदा महागाई वाढण्याची चिन्हे आहेत. जेव्हा कि सर्व सामान्य जनता महागाई कमी होईल, पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल व कर्ज स्वस्तात मिळेल, या आशेवर जगत आहेत. मात्र रुपयाची घसरण होत असल्याचा परिणाम सर्वसामान्यांवर काही दिवसांतच दिसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी जानेवारीत एका डॉलरसाठी 83 रुपये मोजावे लागत होते. आता 87 रुपयांच्या आसपास मोजावे लागतात. म्हणून आयात वस्तू महाग होत आहेत.
Sharad Pawar : ‘गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे’ शाहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
कोणत्याही देशाचे चलन घसरते तेव्हा त्याचे परिणाम सर्वसामान्यांवरही होतात. तुमची मुले परदेशात शिक्षण घेत असतील तुम्हाला जास्त पैसे पाठवावे लागू शकतात. तुमचा व्यवसाय इम्पोर्टचा असेल तर तुम्हाला उत्पादने मागवताना जास्त पैसे मोजावे लागू शकतील. भारतात 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. रुपयाच्या नीचांकीपातळीमुळे सरकारला कच्चे तेल खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचे दर वाढतील आणि या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांवर होण्याची भीती विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल देऊ नये, अशी तंबी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. महागडा डॉलर, त्यात कच्च्या तेलाचे दर जास्त यामुळे पेट्रोल-डिझेल महाग होऊन देशांतर्गत महागाई वाढू शकते व त्याचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागू शकतो. भारत मोबाइल उत्पादनाचा हब होत असला तरी त्याचा कच्चा माल परदेशातून येतो. तो मागवण्यासाठी अधिक पैसै खर्च होण्याची भीती वाढत आहे. इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीवरही वाढत्या डॉलरचा परिणाम होईल. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स महाग होऊ शकतात. डॉलर वधारल्यामुळे कंपन्यांना कच्चा माल आणि इतर वस्तू महाग पडू शकतात, ज्यामुळे त्यांना खर्च कमी करण्यासाठी कामगारांची संख्या कमी करावी लागू शकते. म्हणजेच येत्या काळात महागाई व बेरोजगारी आणखीन वाढण्याची शक्यता अर्थशास्त्रीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे आणि याला जबाबदार म्हणुन त्यांनी RBI चे माजी गवर्नर शक्तीकांत दास यांच्याकडे बोट दाखवले आहे.