-0.5 C
New York

Dombivali : चला पुस्तक वाचू’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी केले वाचन

Published:

डोंबिवली ( शंकर जाधव ) : उत्तम चारित्र्य घडवायचे असेल तर महनीय व्यक्तींचे चरित्र वा आत्मचरित्र वाचले पाहिजे.या चरित्र वाचनातून कोणत्या प्रसंगी आपण कसे वागायचे , स्वतःला कसे घडवायचे अशा अनेक सकारात्मक गोष्टी कळतात ऊर्जा मिळते जी आयुष्याच्या प्रवासात कायम उपयोगी पडते असे प्रतिपादन अखंड वाचनयज्ञचे संकल्पनाकार व प्रणेते डॉ. योगेश जोशी यांनी केले. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने पुंडलिक पै यांच्या संकल्पनेतून खर्डीकर क्लासेसच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘चला पुस्तक वाचू या’ उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

Sharad Pawar : ‘गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे’ शाहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर

  त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केवळ वाचनाचे महत्व समजावून सांगितले नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी वाचन करून स्वतःचे व्यक्तिमत्व कसे घडविले हे विविध प्रसंग सांगून स्पष्ट केले. तसेच रोहन प्रकाशनचे वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ' जीनियस जेम डॉ जीएम' या पुस्तकातील प्रेरणादायी प्रसंगांचे वाचन डॉ योगेश जोशी यांनी केले.परदेशी भाषा अभ्यासक संकेत खर्डीकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक हेमंत नेहते तर आभार प्रदर्शन शिक्षण सेवाव्रती डॉ. सुनील खर्डीकर यांनी केले. या प्रसंगी खर्डीकर क्लासेसच्या डोंबिवली , ठाणे , कल्याण शाखेतील  ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके मासिके आणि वर्तमानपत्राचे वाचन केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img