शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी काढता पाय घेतल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. सध्या महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोडून जात असल्याचं दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटातील कोकणातील एका नेत्याने आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेतील अंतर्गत वाद समोर येताना दिसत आहेत.
चिपळून येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हजेरी लावली होती. त्यात त्यांनी जोरदार हल्लाबोल केल्याचं दिसून आलं तर पदाधिकाऱ्यांचे कान देखील टोचले.’शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली आहे,जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणार्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं,शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करा असा सल्ला त्यांनी विनायक राऊत यांना दिला. निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सर्वांच्या नावाने फतवे काढावे लागतात. निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकार्यांच्या कार्य पद्धतीवर भास्कर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.’
Sanjay Raut : शरद पवारांच्या पत्रकार परिषदेवर लक्ष ठेवा; पवारांच्या भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, असा नाराजीचा सूर सुद्धा भास्कर जाधव यांनी आवळला. चिपळूणमधील पदाधिकारी बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल बोलून दाखवली. पक्षाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी ताशेरे ओढले. या बैठकीला सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम यांचीही हजेरी होती.
दरम्यान, भास्कर जाधवांच्या या टीकेवर खासदार संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया देत, पक्ष कठीण काळातून जात असताना नेत्यांनी जबाबदारीने काम केलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पटतेच असे नाही. असं विधान केलं आहे.