-0.5 C
New York

Balasaheb Thackeray : स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव मंजूर?

Published:

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या (Balasaheb Thackeray National Memorial) पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या 23 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षााआधी पूर्ण करण्याचा व त्या स्मारकाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, या स्मारकाला घेऊन आता राज्यात वाद निर्माण होऊन राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या स्मारकाच्या अध्यक्षपदावरूनच हटवण्याचा प्रस्ताव आता मंजूर करण्यात आला. शिंदे गट आता हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदार कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Sandip Sabharwal : भारताचा परकीय चलनसाठा 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; शक्तिकांत दास दोषी?

2022 मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदेंच्या नेतृत्वात युतीचं सरकार बनलेलं आपण पाहिलं आहे. 2026 मध्ये काम पूर्ण होण्याची शक्यता आहे व उद्घाटनवेळी जे सरकार असेल, त्याचे ते श्रेय असेल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर मात्र आता शिंदे गट आक्रमक झालेला पहायला मिळतोय.

रामदास कदम हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत काम करतात. स्मारकाबद्दलचा निर्णय आधी झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे हे मोठं व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाला राजकारणात ओढू नये असे विधान भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबद्दल किंवा त्याच्या अध्यक्षपदाबद्दल कुठलाही वाद होऊ नये असे दरेकर यावेळी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे स्मारक हा कुठल्याही स्थितीत वादाचा विषय होऊ नये. पक्षाच्या पलीकडे जाऊन एक वेगळा आदर बाळासाहेब ठाकरेंबद्दल सर्वांच्याच मनात असल्याचे दरेकर म्हणाले.

Sharad Pawar : ‘तिथे आघाडीचा विचार नाही’; ठाकरे गटानंतर आता शरद पवारही स्वबळावर लढणार ?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img