2.5 C
New York

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये होणार महाराष्ट्राची पुनरावृत्ती?

Published:

सध्या मोठ्या हालचाली पश्चिम बंगालच्या राजकारणात घडताना पाहायला मिळत आहे. माजी राज्यसभा खासदार शांतनू सेन आणि आमदार अराबुल इस्लाम यांना तृणमूल काँग्रेसचे निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया दोन्ही नेते करत असल्याचे सांगितले जाते व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यामुळे नाराज होत्या. दोन्ही नेत्यांवर अखेर कारवाई करत पक्षाकडून त्यांना निलिंबत करण्यात आले आहे.

मात्र, मागील काही दिवसांपासून ममता बॅर्जी व अभिषेक बॅनर्जी यांच्यात आलबेल नसल्याचे सांगितले जाते. त्यातच आता अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळच्या नेत्यावर कारवाई केल्याने तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षांतर्गत दोन गट पडले आहेत. अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जींचा एक असे दोन गट पडल्याचे दिसून येते. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर निशाणा साधताना पाहायला मिळतात.

शांतनू सेन यांनी आरजी कर प्रकरणात राज्यातील पोलिसांवर टीका केली होती. तसेच, अनेक मुद्यांवर राज्य सरकारच्या विरोधी भूमिका मांडली आहे. काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून त्यांच्या पत्नी काकली सेन यांना देखील पक्षाच्या काढण्यात आले होते. दरम्यान,पक्षातील नेत्यांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. 2026 ला विधानसभा निवडणुका पश्चिम बंगालमध्ये होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी अनेक शिस्तपालन समित्या स्थापन करत नेत्यांना विविध मुद्द्यांवर पक्षाच्या धोरणांच्या विरोधात जाण्यावरून इशारा दिला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img