2.5 C
New York

Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ

Published:

आज सोमवार (१३ जानेवारी) पासून जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव (Mahakumbh 2025) अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे . महाकुंभ मेळावा सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी असे तब्बल ४५ दिवस आयोजित करण्यात आला आहे. जय्यत तयारी या महाकुंभ मेळाव्यासाठी करण्यात आली आहे. आजपासून महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ प्रयागराजमध्ये करण्यात आला आहे. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.

आजपासून महाकुंभ २०२५ चा शुभारंभ होत आहे. हा महाकुंभ मेळावा पुढील ४५ दिवस प्रयागराजमध्ये सुरु असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महाकुंभ मेळाव्यानिमित्त त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होत आहे. हा महाकुंभ असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आध्यात्मिक वारशाचं हा महाकुंभ प्रतीक आहे, असे म्हटले आहे.

गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर होणाऱ्या या श्रद्धेच्या महान सोहळ्यात येत्या ४५ दिवसांत अध्यात्माचे अनेक रंग रंगणार आहेत. या महाकुंभाचे तब्बल १२ वर्षांनंतर आयोजन करण्यात आले आहे. तथापि, संतांचा असा दावा आहे की या घटनेसाठी खगोलीय बदल आणि संयोग १४४ वर्षांनंतर होत आहेत, ज्यामुळे हा सोहळा अधिक शुभ झाला आहे. ३५ कोटी भाविक कदाचित त्यामुळेच यावेळी महाकुंभाला येतील असा विश्वास उत्तर प्रदेश सरकारला आहे.

Mahakumbh 2025 तगडी सुरक्षा व्यवस्था

45 हजार पोलीस कर्मचारी उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये होणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. साधू-संत, भाविक तसेच परदेशातील व्यक्ती या मेळाव्यासाठी सहभागी होणार असल्याने 55 हून अधिक फोर्स यंदा सुरक्षेसाठी असणार आहेत.

२,७५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे महाकुंभच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ४० कोटी भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम केले आहे. त्यासोबतच AI-आधारित तब्बल २६८ व्हिडीओ कॅमेरे गर्दीच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img