2.5 C
New York

Chhagan Bhujbal : नाव मागे घेतलं तर ठीक अन्यथा ; भुजबळांचा लाडक्या बहि‍णींना इशारा

Published:

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. नियमात न बसणाऱ्या महिलांकडून (Ladki Bahin Yojana) दंडवसुली केली जाईल, असा इशारा छगन भुजबळांनी म्हटलंय. ते म्हणाले की, ज्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी लाडक्या बहि‍णींच्या मायेचा उमाळा येत होता, तेच नेते आता लाडक्या बहि‍णींना वसुलीचा इशारा देत आहेत, असं भुजबळ म्हणाले आहेत.

भुजबळ म्हणाले की, नियमामध्ये बसत नसलेल्या लाडक्या बहि‍णींनी स्वत:हून आपले अर्ज मागे घ्यावेत. नाहीतर त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा छगन भुजबळांनी दिलाय. सत्ताधारी नेत्यांनी निवडणूक झाल्यानंतर (Maharashtra Politics) योजनेसाठी नियमबाह्य ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना अर्ज मागे घेण्याचा इशारा दिलाय. नाहीतर दंड भरावा लागेल असं देखील भुजबळ म्हणालेत. त्याचप्रमाणे निवडणुकीपूर्वी बोगस लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर केले असतील तर कोणावर कारवाई करणार? असा सवाल देखील भुजबळांनी केलाय.

वादग्रस्त शक्तिपीठ महामार्गाला पुन्हा ‘बळ’; हिरवा कंदील दाखवत राज्य सरकारचे पहिले पाऊल

नाशिकमध्ये बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन मोठा इशारा दिला. आमदार छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झालाय. पण यावेळी नियम वेगळे असून एका घरात दोन महिलांना योजनेचा देता येत नाही.मोटार गाडी असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ देता येणार नाही. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हा योजनेचा उद्देश आहे.

नियमात बसत नाही अशा महिलांनी स्वत:हून आपले नाव काढले पाहिजे. दिलेले पैसे परत मागण्यात काहीच अर्थ नाही, अशा महिलांनी स्वत:हून नावे मागे घ्यावीत. अन्यथा सरकारने दंडासह वसुली करावी, असा इशाराच भुजबळांनी दिलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img