0.5 C
New York

Santosh Deshmukh : विष्णू चाटेचा मोबाईल कुठंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID समोर मोठं आव्हान

Published:

संतोष देशमुख बीडमधील संरपंच हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केला नाहीये. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. नाशिकमध्ये विष्णू चाटेने त्याचा मोबाईलफेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे फोनमध्ये नक्की कोणतं सिक्रेटत्याच्या दडलंय, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे.

आत्तापर्यंत पोलिसांनी पाच मोबाइल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जप्त केलेत. तपासणीसाठी हे सर्व जप्त केलेले मोबाईल प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेत. मोबाईल मात्र आरोपी विष्णू चाटे (Beed Crime) याने न दिल्यामुळं गुढ आणखीन वाढलंय. सीआयडीला आरोपी विष्णु चाटेचा मोबाईल अजून सापडलेला नाहीये. याप्रकरणी विष्णू चाटेचा फोन सापडल्यास अनेक प्रश्नांची उकल होईल, असं पोलीस म्हणत आहेत.

मात्र, विष्णूने हा मोबाईल नेमका कुठे फेकला? त्याने ते ठिकाण आठवत नसल्याचं हे पोलिसांनी विचारले असता सांगितलंय. त्यामुळे चाटेचा मोबाईल सीआयडी यंत्रणेला सापडत नाहीये. विष्णू चाटेच्या मोबाईलवरुनच वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय व्यक्त केला गेलाय. याच फोनवरून खंडणीची धमकी देण्यात आली होती. विष्णु चाटेचा मोबाईल त्यामुळे तपासात अतिशय महत्वाचा आहे.

विष्णु चाटेचा मोबाईल हा बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात अत्यंत महत्वाचा दुवा आहे. कारण अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विष्णूच्या मोबाईलवरून वाल्मिक बोलता होता. हात-पाय तोडण्याची देखील धमकी त्याने 2 कोटींच्या खंडणीसोबत दिली होती. अशी ऑडिओ क्लिप पोलिसांना देखील सापडल्याची माहिती मिळतेय.

विष्णू चाटेला उद्या पुन्हा संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्यायालयात हजर करणार आहेत. मात्र कृष्णा आंधळे हा अजून देखील फरार आहे. राज्याबाहेर देखील सीआयडी पथक कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत. तसेच विष्णू चाटेला 8 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img