मंत्रीपदापासून वंचित राहिलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिर्डी येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नियुक्तीरवींद्र चव्हाण यांची पुढील काळात केली जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे हेच सांभाळणार आहेत.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूनही चंद्रशेखर बावनकुळे असून त्यांनी प्रदेशाध्यक्षपद अद्याप सोडलेले नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत होती. त्यांनी माध्यमांना रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देतो. सर्वांनी मला कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. हा माझा सन्मान असून कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा हा पक्ष असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणालेत.राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखालील पूर्ण बहुमताचं महायुतीच चांगलं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बंडखोरांना पुन्हा भाजपात घेणार का? बावनकुळेंच्या उत्तराने ‘त्यांची’ घरवापसी बारगळणार..
Ravindra Chavan कोण आहेत नवे कार्यकारी पक्ष अध्यक्ष
रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सलग ४ वेळा २००९ पासून त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलाय. वींद्र चव्हाण यांनी ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमिळवलं होतं. चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती.