0.5 C
New York

Fire in Kurla : कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग; मोठी वित्तहानी

Published:

मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील एलबीएस मार्गावरील रंगून ढाबा या हॉटेलमध्ये रात्री सव्वा नऊच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भडकली होती की आगीच्या ज्वाळा दूरूनही दिसत होत्या. (fire in Kurla) उपाहारगृहाच्या खालच्या मजल्यावर ही आग लागली होती. कुर्ला पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गावर कल्पना टॉकीजच्या समोर असलेल्या रंगून जायका ढाबा या हॉटेलमध्ये भीषण आग लागली. ही आग रात्री सव्वा नऊच्या सुमारास लागली .

अवघ्या काही मिनिटांमध्ये आग लागल्यानंतर तिथे अग्निशमन दल पोहोचले आणि आग नियंत्रणात आणली. ही आग अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमध्ये अजून पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. आता नेमकी कशाने ही आग लागली याचा शोध हा घेतला जातोय. मोठे नुकसान या आगीच्या घटनेत झाल्याचे देखील सांगितले जातंय.

अग्निशमन दलाचे पथक,तीन पाण्याचे ट्रॅंकर, चार फायर इंजिन, पालिका विभाग कार्यालयाचे पथक, पोलीस, विद्युत वितरण कंपनीचे पथक घटनास्थळी जमले आहे. आग विझवण्याचे काम रात्री उशीरपर्यंत सुरु होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img