0.5 C
New York

Sharad Pawar : आधी संघाचं कौतुक, आता थेट फडणवीसांनाच फोन; शरद पवारांच्या मनात नक्की काय?

Published:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषदा, महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच दोन दिवसांपू्र्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक करत मोठी गुगली टाकली. त्यांच्या या वक्तव्यांची चर्चा सुरुच असताना आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. बीड आणि परभणीतील परिस्थितीवर चर्चा झाली. हा भाग शांत झाला पाहिजे. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी राज्य शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही. बीड आणि परभणी कसं शांत होईल हे देखील पाहिलं पाहिजे. मी येथे येण्याआधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. राज्य अशांत राहिल असं चित्र आपल्याला निर्माण होऊ द्यायचं नाही. बीड आणि परभणीतील वातावरण शांत करण्यासाठी आपणा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात समाजात दुफळी दिसत आहे. त्यामुळे हा भाग शांत झाला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

बंडखोरांना पुन्हा भाजपात घेणार का? बावनकुळेंच्या उत्तराने ‘त्यांची’ घरवापसी बारगळणार..

Sharad Pawar संघाचं कौतुक, फडणवीसांचं उत्तर

शरद पवारांनी संघांचं कौतुक केल्यानंतर भाजप आणि शरद पवार यांच्यात जवळीक वाढत आहे का असे फडणवीस एका मुलाखतीत वि्चारण्यात आले होते. राजकारणात काहीही होऊ शकतं. पण तसं काही झालंच पाहिजे असंही काही नाही. परंतु, तसं होणं चांगलं आहे असं काही मला वाटत नाही. राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं आपण म्हणतो तेव्हा राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठं नेऊन बसवेल याचा काही भरवसा नाही, असे सूचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

शरद पवार अतिशय चाणाक्ष नेते आहेत. त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल की त्यांनी लोकसभेच्या वेळी एवढे मोठे वायूमंडळ तयार केले होते. परंतु, ते एकाच मिनिटांत कसे पंक्चर झाले. ते वायूमंडळ पंक्चर करणारी शक्ती कोणती. त्यांच्या लक्षात आलं की ही शक्ती नियमित राजकारण करणारी नाही. राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. कधीतरी प्रतिस्पर्ध्यांचही कौतुक करावं लागतं. तसं त्यांनी संघाचं कौतुक केलं असेल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img