मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका – संजय राऊत
दिल्लीत आठवलेंचा स्वबळाचा नारा, १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा
भाजपने रवींद्र चव्हाणांना दिली मोठी जबाबदारी; महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
भाजप स्वबळाची भाषा करत असल्यास आम्ही सुद्धा तयार – संजय शिरसाट
धाराशिव मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा
सरपंच हत्या प्रकरणातील मोठी अपडेट !
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लागू. या प्रकरणातील ७ ही आरोपींवर मोक्का कायदा अंतर्गत कारवाई होणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा ‘एकला चलो’चा नारा
मुंबई ते नागपूरपर्यंत महापालिका स्वबळावर लढणार. आम्ही भाजपाचे सर्वात जुने आणि विश्वासार्ह मित्र होतो.मी मोदींना देव मानतो. असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
समन्वय राहिला नाही तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल – संजय राऊत
सरपंच हत्या प्रकरणी आज जालन्यात निषेध मोर्चा
ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही – खासदार अमोल कोल्हे
सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पैठण येथे मराठा समाजाचा मोर्चा
बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज १ महिना पूर्ण झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज पैठण मध्ये मराठा समाजाचा मोर्चा होणार आहे.
आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
आज दुपारी ४ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती
उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज होणार
दिल्ली : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या समितीला कायदा आणि न्याय मंत्रालयाचे अधिकारी माहिती देतील. जेपीसीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांनी ही बैठक बोलावली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलगोबीच्या शेतात फिरवला रोटावेटर
फुलगोबीला दर मिळत नसल्यानं खर्चही निघत नाहीय. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने २ एकर शेतीवर रोटावेटर फिरवला. फुलगोबीला एक ते दोन रुपये किलो असा भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त झाला आहे.
सिंहगड रस्त्याला भीषण अपघात महिला गंभीर जखमी
सिंहगड रस्ता, ता. 8 : मुख्य सिंहगड रस्त्याला भा. द. खेर आनंदनगर चौकात झालेल्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. विठ्ठलवाडी कडून माणिकबागच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी आणि पिकअप ( ट्रक) यांच्यात मोठी धडक बसली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला डोक्याला दुखापत झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज जळगाव दौऱ्यावर
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर
कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या 33 व्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती राहणार आहे