[आलमे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम]
प्रतिनिधी:दि.११ जानेवारी ( रमेश तांबे )
ओतूर : ज्ञानदा शिक्षण मंडळ नारायणगाव संचलित अनुदानित आश्रम शाळा आलमे ( ता.जुन्नर ) येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली असल्याची माहिती संस्थेचे सचिव अमित बेनके व मुख्याध्यापक भगीरथ पठारे यांनी दिली.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ज्ञानदा शिक्षण मंडळ नारायणगांव संचलित अनुदानित आश्रम शाळा, आलमे या शाळेतील १८० विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ला या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली व एक पर्यावरण पूरक उपक्रम म्हणून शिवजन्म स्थळापासून ते पहिल्या दरवाजापर्यंत किल्ल्यावर असणारा प्लास्टिक कचरा गोळा केला. सदर ठिकाणी बारा पोती प्लास्टिक कचरा गोळा करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच आलमे आश्रम शाळेतील शिक्षक इजाज मोमीन, प्रकाश फापाळे, सुरेखा मोधे, सुहास शिंदे, सुदाम पवार, शंकर पडवळ, भरत नायकोडी, प्राची पठारे, सुदर्शन माळी, राजेंद्र भोर, निलेश शिंदे, शिपाई रविंद्र काकडे आदींनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना राबवलेल्या स्वच्छता मोहीमेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.