मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte) याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उच्च न्यायालयाने जयदीप आपटे याला जामीन मंजूर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण (Malvan) येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात कोसळला. पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच तो कोसळल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. तर या घटनेवरून राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलं होतं. विरोधी पक्षाकडून तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
तसंच, दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नसल्यामुळं हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम या प्रकरणी लागू शकत नाही, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे. हा निर्णय दिलान्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने आहे. मात्र आता जयदीपला आपटेला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता. त्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती.
मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर, खुद्द अर्थमंत्र्यांचे प्रश्नचिन्ह
Jaydeep Apte नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 4 डिसेंबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते करण्यात आलं होतं. मात्र, हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला. या पुतळ्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 44 लाख खर्च केल्याची माहिती सामाजिक बांधकाम विभागाने दिली होती. तसंच या पुतळ्याचे काम नौदलामार्फत झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. या घटनेवरून राज्यातील राजकारण तापलं होतं. या पुतळ्यात सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी करत सरकारला घेरलं होतं. या प्रकरणात सरकारची मोठी बदनामी झाली होती.