महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळाले आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळले. महायुतीच्या नेत्यांकडून या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. आता नेत्यांना आश्वासनांचा सरकार स्थापन झाल्यानंतर विसर पडत चालल्याचे दिसत आहे. शेतकरी कर्जमाफीवरुन महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) 360 अंशात घुमजाव केले आहे. आता शेतकरी कर्जमाफीचा शब्द लाडकी बहीण योजनेला निकष लावले जात असल्याची चर्चा सुरु असतानाच आम्ही दिलाच नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
काल पुण्यातील दौंडमध्ये एका जाहीर कार्यक्रमातउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी भाषणात आपण कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नाही, असे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित पवारांनी केले. शेतकरी कर्जमाफी त्यामुळे आता मिळणार की नाही, या संभ्रमात अडकले आहेत.
कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत केली होती. कर्जमाफी निकालानंतरही त्यांनी योग्य वेळी करण्यात येईल, असे विधान केले होते. मात्र, खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनीच फडणवीसांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा विषय ऐकला का?दौंडमधील एका कार्यक्रमात बोलताना ….अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात, असे सांगून फडणवीसांच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत अनिश्चितता निर्माण केली आहे.
महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनीदेखील अजित पवार यांच्या विधानाबरोबरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं आहे. “विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. आम्ही तीन सिलेंडर देण्याची योजना बंद करणार नाहीत. मुलींचं उच्च शिक्षण देखील मोफत सुरु राहील. महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत आहे. आम्ही लाडक्या शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलेलं आहे. अशा अनेक योजना सुरू आहेत. तसेच आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मग कर्ज माफी करणार आहोत. पाच वर्षात करायची आहे ना?”, असं विधान हसन मुश्रीफ यांनी केलं.