नागपूरमध्ये काल सायंकाळी जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. शरद पवार यांनी अलीकडेच संघाच्या कामकाजाचं कौतुक केलं होतं. प्रचाराची योग्य रणनीती विधानसभा निवडणुकीत संघाने आखली होती. त्यामुळे निवडणुकीत घवघवीत यश मिळालं असे शरद पवार म्हणाले होते.
भाजप आणि शरद पवार यांच्यात जवळीक वाढत आहे का असे विचारले असता फडणवीस म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकतं. पण तसं काही झालंच पाहिजे असंही काही नाही. परंतु, तसं होणं चांगलं आहे असं काही मला वाटत नाही. राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं आपण म्हणतो तेव्हा राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठं नेऊन बसवेल याचा काही भरवसा नाही.
महायुतीत अजित पवार यांच्या एन्ट्रीनं बरीच समीकरणं बदलली. अजित पवारांच्या आधीच एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी मैत्री करत मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतलं होतं. या इतिहासातील गोष्टी आता बदलल्या आहेत. सध्या तिन्ही पक्ष महायुतीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघे उपमुख्यमंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला.
मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर, खुद्द अर्थमंत्र्यांचे प्रश्नचिन्ह
देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीच्या रॅपीड फायरमध्ये अजित पवार की एकनाथ शिंदे? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, ‘माझ्यापुरतं विचारलं तर माझे दोघांशी देखील अतिशय चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे. तसंच, राजकीय परिपक्तवता असल्यामुळे अजित पवार यांच्यामध्ये एक त्यांचे आणि माझे सूर मोठ्या प्रमाणात जुळतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Devendra Fadnavis कठोर राजकारणी कोण?
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर बोलताना म्हटलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनुशासित राजकारणी आहेत. त्यांनी मार्ग जो पकडला मग कितीही अडचणी त्या मार्गावरून आल्या तरी त्यामधून बाजूला व्हायचं नाही हे अनु अनुशासन फार कठीण आहे. आता त्यांच्या एवढं १० टक्केही माझ्याकडे मग मला विचारलं तर अनुशासन नाही. त्यामुळे त्यांना कठोर म्हणता येणार नाही. तसेच एखादा राजकीय दृष्टीने अमित शाह असे आहेत की त्यांना जर आपण असं म्हटलं की निर्णय करायचा तर ते घेऊ शकतात’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.