प्रतिनिधी – शंकर जाधव
डोंबिवली : गेल्या चार दिवसांत कल्याण-डोंबिवलीत (Kalyan-Dombivali) मोठया प्रमाणात गांजा आणि इतर अंमली पदार्थ जप्त करत अनेकांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल केले आहे. डोंबिवलीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 34 ग्रॅम एमडी ड्रग्जसह विनय अय्यर या आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांचा आणखी एक मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे याच्या माहितीनुसार डोंबिवली मानपाडा परिसरात एमडी ड्रग्ज घेऊन येणारा विनय अय्यर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख किमतीचे 34 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. कल्याण डोंबिवलीत अंमली पदार्थांचा विरोधात तीव्र कारवाई करत गेल्या चार दिवसांत कल्याण-डोंबिवलीतील विविध गांजा आणि इतर अंमली पदार्थ मोठया प्रमाणत जप्त करून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.