-1.9 C
New York

BJP : भाजपाने मिनी मंत्रालयासाठी फुंकले रणशिंग

Published:

लोकसभेतील पराभवाचा कलंक भाजपाने (BJP) भरघोस मतांआधारे धुवून काढला. विधानसभेतील संघाचे बौद्धिक भाजपाच्या कामी आले. अफाट असा विजय मायक्रो प्लॅनिंग, लाडकी बहीण योजनेने मिळवून दिला. आता भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी या विराट दर्शनानंतर आतापासूनच मैदानात उतरली आहे. भाजपाने आतापासूनच मिनी मंत्रालयासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी भाजपच्या महाविजय 3.0 अभियानास उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यामुळे मित्र पक्षांसह विरोधकांसाठी हा आलर्म आहे.

BJP मिनी मंत्रालयासाठी फुंकले रणशिंग

राज्यातील मिनी मंत्रालयासाठी भाजपाने रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या महाविजय 3.0 अभियानास उद्यापासून सुरुवात होणार आहे. आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत. दुसर्‍या बैठकीत फडणवीस हे भाजपच्या सर्व आमदार व मंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. मिनी मंत्रालयासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केल्याने इतर पक्षांना पण आता बांधणी सुरू करावी लागणार आहे.

BJP उद्या शिर्डीत भाजपाचे राज्य अधिवेशन

उद्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे निवडणुकीसाठी सर्व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतील. पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने होईल. देवेंद्र फडणवीस हे दुसर्‍या सत्रात मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील. भाजप नेत्यांचे उद्या दिवसभर विचार मंथन होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणानेअधिवेशनाचा समारोप हा होईल.

BJP काय असेल या अधिवेशनात?

विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला जाईल.महाविजय 3.0 ची घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात केली जाईल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी रणनिती आखली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अभिनंदन प्रस्ताव संमत केला जाईल.

भाजपाने आतापासून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीपर्यंत भाजपाचा टक्का वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. अर्थात ही निवडणूक सत्तेतील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील की एकत्र लढतील हे समोर आलेले नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img