-2.3 C
New York

Vijay Wadettiwar : कोल्हेंच्या ‘काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ’ वक्तव्यावर वडेट्टीवारांचा पलटवार

Published:

झोपेतून जागा व्हायला ठाकरे गट अजूनही तयार नाही, खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही असं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल आहे. कोल्हे यांनी राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना , त्यांच्याच सहयोगी पक्षांबाबत हे भाष्य केलं आहे. (Amol Kolhe) त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असून कोल्हेंच्या विधानामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचाही (Vijay Wadettiwar) संताप झाल्याचे दिसून आलं. आपल्या पक्षाकडे कोल्हेंनी बघावं, त्याबद्दल बोलावं असा सल्ला वडेट्टीवारांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची संघटनात्मक बैठक वाय.बी . चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. शरद पवार , जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी अनोल कोल्हे यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आलं होतं.

Vijay Wadettiwar अमोल कोल्हे काय म्हणाले ?

ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला राज्यातील परिस्थिती पाहिली तर तयार नाही. काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही. शरद पवार आपल्याकडे लढणारे आहेत. मोठी जागा शिल्लक सध्या विरोधी पक्षात आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे.

Vijay Wadettiwar वडेट्टीवार संतापले

आता राज्याच्या राजकारणात कोल्हे यांच्या या विधानाचे पडसाद उमटताना दिसत असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार संतापले आहेत. आपल्या पक्षाकडे तर अमोलरावांनी थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा, वडेट्टीवारांनी असं म्हणत  अमोल कोल्हेंना खोचक सल्ला दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img