संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. सर्वच स्तरावरून या हत्येचा निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, (Chandrashekhar Bawankule) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराड परळीमध्ये लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे प्रकरण आता चांगलंच उचलून धरलं आहे. एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसं केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुळेंच्या याच प्रश्नाला प्रत्युत्तर दिलं आहे.
Chandrashekhar Bawankule काय म्हणाले बावनकुळे?
लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष परळीत वाल्मिक कराड आहे, विरोधकांकडून यावर टीका करत आहेत, याबाबत विचारले असता ते म्हणाले, चांगलं काम वाल्मिक कराडने केलं असेल म्हणून त्याला लाडकी बहीण योजनेचंअध्यक्ष पद दिलं असेल. असं त्यांनी यावेळी सांगितले. तसंच, बीडमधील हत्या प्रकरणात प्रकरणात सरकारने पुढाकार घेतला आहे. हे सरकार कारवाई करत आहे. अनेक जणांच्या चौकशीही लावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणांमध्ये स्वतः लक्ष घालून आहेत. शेवटपर्यंत लक्ष देतील आणि आरोपींना शिक्षा भेटेल.
‘चर्चा लांबवल्याने आम्हाला फटका बसला’; कॉंग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
Chandrashekhar Bawankule भेगडे यांच्यावर कारवाई
यावेळी त्यांनी मावळ विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके विरोधात प्रचार करणारे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर आमची शिस्तभंग समिती योग्य निर्णय घेईल, असंही सांगितलं. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांचं काम केल्याचंही बावनकुळे म्हणाले.