ओतूर,प्रतिनिधी:दि.९ जानेवारी ( रमेश तांबे )
जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्या पासून मेंढपाळांचे व नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण इत्यादी प्रकारच्या अनेक उपाययोजना वन विभागामार्फत राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणाऱ्या मेंढपाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहून,
जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी त्यांचेसाठी सौर दिवे आणि तंबूची संकल्पना मांडली.यासाठी वनविभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल उचलून,जुन्नर वनविभागातील ओतूर वनपरिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या ओतूर व उदापूर मधील मेंढपाळांना राहण्यासाठी ४९ तंबू व ४० सौर दिवे वाटप करण्यात आले आहेत. सौर दिवे आणि तंबूमुळे बिबट हल्ला,सर्पदंश तसेच पाऊस व थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होणार असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी सांगितले.
बुधवार दि. ८ जानेवारी रोजी ओतूर, उदापूर, डिंगोरे, आळु,मांदारणे येथे वास्तव्यास असलेल्या राजेंद्र बाळू कोळपे,ज्ञानेश्वर दिनकर डुबे, नितीन चितळकर, बबन दुबे,कोंडाजी खामग बिरू बरकडे ,बाबुराव बरकडे,योगेश कोळपे,अविनाश घोगरे ,निलेश पानसरे, सोपान चितळकर,सुखदेव मोरे,बबन कारंडे, धुळा बरकडे,गणेश माने, पंकज डोळझाके, दीपक शेंडगे, बबन भांड,देवराम काळे, सुभाष चितळकर,राहुल चितळकर,भीमा चितळकर,संजय खामगळ,महादू खेमनर,संदीप कोकरे,लक्ष्मण विचकुले,संतोष तांबे,नामदेव तांबे,सोन्याबापू घुले,सदा तांबे,मालू कारगळ,आदेश करगळ,गणेश कोकरे,गोपीनाथ कारगळ, संतोष बाचकर,अंकुश पोकळे,पांडुरंग बरकडे व इतर अशा एकुण ४० मेंढपाळांना सौर दिवे व तंबूचे वाटप जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या आदेशावरून तसेच ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले.सौर दिवा कशा प्रकारे वापरावा तसेच तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनरक्षक दादाभाऊ साबळे यांनी करून दाखवले.यावेळी परिविक्षाधीन अधिकारी निकिता बोटकर तसेच वन कर्मचारी वन कर्मचारी फुलचंद खंडागळे, किसन केदार,गंगाराम जाधव आदींनी सहकार्य केले.