मुंबई / रमेश औताडे
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय विश्वासू म्हणुन परिचित असलेला बीड जिल्ह्यातील खंडणीखोर आरोपी वाल्मीक कराड याच्यावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला नाही तर या प्रकरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याची भीती मराठा क्रांती ठोक मोर्चा चे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्र देऊन व्यक्त केली.
महाराष्ट्र हे ” कायद्याचे राज्य” ही भावना दृढ झाली पाहिजे, त्यासाठी अपहरण,खंडणी व खुन प्रकरणाचा सुत्रधार वाल्मीक कराड याच्याविरुद्ध बी एन एस १०३ ( जुना आयपीसी ३०२ ) अन्वये तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून खटला अंडर ट्रायक चालवावा.
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करावी. त्यांच्या कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
बीड मधिल रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करून, खंडणी आणि गुंडगिरीला व अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी आपण पुढाकार घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा चे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी यावेळी केली.